महाराष्ट्र
ब्रेकिंग! गडकिल्ल्यांना जोडणारी आयकॉनिक रेल्वे टूर

- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी, गडकिल्ले पाहाता यावेत, राज्याची संस्कृती समजावी यासाठी आयकॉनिक रेल्वे टूरची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहाता येणार आहेत. ही टूर जवळपास दहा दिवसांची असेल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या योजनांची माहिती दिली.
- छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनची ही यात घोषणा करण्यात आली आहे. या सर्किट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान रेल्वेमंत्र्यांबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी या योजनेची माहिती दिली. मुंबईतील बरेच रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. शिवाय राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास 24 हजार कोटी राज्याच्या पदरात पडले आहेत. या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे.
- या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे. या ट्रेनची टूर दहा दिवसाची असणार आहे. या माध्यमातून ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. सांस्कृतिक स्थळे आहेत, त्याठिकाणी ही रेल्वे जाणार आहे.