महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे तब्बल २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाने रायगड, पुणे घाटमाथा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, जळगाव, अहिल्यानगर, सातारा घाटमाथा, बीड, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागातही जोरदार पावसाची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याचा अंदाज आहे.
तसेच नंदूरबार, धुळे, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.