सोलापूर

मोदींचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस

  • देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत. मात्र या दरम्यान कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना मोदी यांचा वाढदिवस हा आपल्यासाठी काळादिवस आहे, असे म्हटले. त्यामुळे प्रणिती यांना भाजप नेते आणि मित्र पक्षांनी फैलावर घेतले आहे.
  • आज पंतप्रधान मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. पण हा आपल्यासाठी काळादिवस आहे. कारण सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. विरोधकांना बोलू दिले जात नाही. मतांची चोरी केली जात आहे. माध्यमांचे अधिकार हिरावून घेतले गेले आहेत, असे म्हणत प्रणिती यांनी मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्यावर आणि भाजपवर टीका केली. यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.
  • त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी घोटाळेबाजांच्या सरकारला उलथवण्याचे काम केले. 2014 च्या पूर्वी सगळे काळे दिवस होते. त्यानंतर ही 11 वर्ष म्हणजे परिवर्तनाचे दिवस आहेत. त्यांनी विकसित भारताचा नारा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या लोकांच्या पोटात दुखत आहे.
  • दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मला महिलेचा अपमान करायचा नाही. फम कॉंग्रेसमध्ये स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांवर त्या कुवत, उंची नसताना बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या मुलीला समज द्यावी.

Related Articles

Back to top button