राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल. हा पाऊस मुख्यतः दुपारनंतर पडणार आहे. २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढेल आणि २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान बीड तालुक्यातील मोरगाव येथील जाधव वस्तीतील घरांमध्ये रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरवेळी पाऊस पडल्यानंतर अशीच परिस्थिती उद्भवते. अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गाजवळ ही वस्ती असून रोडच्या कडेला नाला तयार न केल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरांमध्ये घुसत असल्याची परिस्थिती आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
धाराशिवमधील आंबी गावातील मुकेश गटकळ यांच्या घरात सर्वत्र चिखल झाला आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडले आहे. मुलांचे वह्या-पुस्तक देखील पाण्याने भिजले आहे. घरात चिखलाचा खच तयार झाला आहे. आता आम्हाला सरकारनेच मदत करावी, असे आवाहन गटकळ कुटुंबियांनी केले आहे. घरातील परिस्थिती सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले.