- दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यामध्ये सध्या अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतीसह अनेकांची घरे अक्षरशः पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांना ढगफुटीने जलप्रलय आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अशाच प्रकारे जोरदार पाऊस पडत आहे.
- या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. रस्ते बंद आहेत. शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. यावेळी परंडा तालुक्यातील देवगावमध्ये लोकांनी जीव वाचवण्यासाठी घराच्या छताचा आधार घेतला. त्यामध्ये 25 ते 30 नागरिकांना घराच्या छतावरून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने एअरलिफ्ट करत वाचवण्यात आले आहे.
- धाराशिव जिल्ह्यामध्ये पूरस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. अनेक गावांमध्ये घरांसह शेतांसह घरांना पुराचा वेढा पडला आहे. नागरिक घराच्या छतांचा आधार घेत जीव वाचवताना दिसत आहेत. नागरिकांची हेलिकॉप्टरच्या साह्याने एअरलिफ्ट करत सुटका करण्यात आली.
हजारो डोळ्यांमध्ये पाणी, मराठवाड्यात हाहा:कार