गोळीबार करुन मॅच थांबवा, तेव्हाच भारताविरुद्ध जिंकू

Admin
1 Min Read
  • दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकचा सुपर फोर सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. 
  • पाकिस्तानचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव होता. मात्र हा सामना पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान आणि त्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ या दोघांनी केलेल्या कृतीमुळे सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता पाकिस्तानी तज्ज्ञाने दहशतवादी विश्लेषण केल्याने त्यांच्या नसांमध्येच दहशतवाद वाहतो आहे, असे दिसून येत आहे. 
  • सुपर फोर सामन्यात भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाला जर आशिया चषक 2025 च्या अंतिम फेरीत पोहचायचे असेल तर त्यांना उर्वरित सर्व सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. यासंदर्भात एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवर चर्चा सुरू होती. या चर्चेवेळी अँकरने शोमधील एका क्रिकेट तज्ज्ञाला विचारले की, जर पाकिस्तानी संघाने सर्वोत्तम प्रयत्न केले तर ते सामना जिंकू शकतात का? त्यावर क्रिकेट तज्ञाने हसत उत्तर दिले की, मला वाटते की आपण सर्वोत्तम प्रयत्न करावे किंवा कदाचित काही लोकांनी गोळीबार करावा आणि सामना संपवावा. कारण आपण हरणार हे निश्चित आहे. क्रिकेट तज्ज्ञाने हे उत्तर दिल्यानंतर शोमध्ये उपस्थित पाकिस्तानचे माजी कर्णधार बासित अली, कामरान अकमल आणि अँकर देखील हसताना दिसत आहेत. या शोचा व्हिडीओ सध्या व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून भारतीय चाहते टीका करताना दिसत आहेत.
Share This Article