हवामान
ब्रेकिंग! ‘स्कायमेट’चा मान्सूनसाठी अंदाज जाहीर

- भारतातील आघाडीची हवामान अंदाज संस्था ‘स्कायमेट’ने मान्सूनसाठीचा अंदाज जाहीर केला आहे. यंदाचा मान्सून सामान्य राहील आणि जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- यात पाच टक्के चढ- उतार शक्य आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार या चार महिन्यात 868.6 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे.
- स्कायमेटचे जतिन सिंह यांच्या मते, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. परिणामी मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणे आणि एलनिनो प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.