नितीन गडकरींची वाहनधारकांसाठी मोठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. विशेषतः दहा दिवसांत टोल शुल्क कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. नागरिकांनी वाहतूक नियम पाळावेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सीएनन न्यूज – 18 रायझिंग भारत समित 2025 च्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
सरकार सामान्यांना दिलासा देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी स्पष्ट केले की, येत्या आठ ते दहा दिवसांत टोल कमी केला जाईल, टोलची रक्कम शंभर टक्के कमी केली जाणार आहे.
रस्ते अपघात कमी करण्यासंदर्भातील उद्दीष्टांबद्दल गडकरी यांनी मत व्यक्त केले की, पन्नास टक्के अपघात कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ते आमचे उद्दिष्ट होते, मात्र हे उद्दीष्ट साध्य करु शकलो नाही. अपघाताचे कारण रस्ते बांधणी हे आहे, रस्ते बांधणीत काही त्रुटी होत्या. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी चाळीस हजार कोटींचा खर्च केला आहे, असेही त्यांनी सांगितले.