हवामान
राज्यात तापमानाचा उद्रेक!

राज्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाळा शिगेला पोहोचला आहे. भुसावळ येथे तापमानाचा पारा थेट 45 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली असून राज्यातील सर्वाधिक तापमानाची ही नोंद ठरली आहे. हवामान विभागाने जळगाव, अकोला, नागपूरसह इतर जिल्ह्यांना हायअलर्ट जारी केला आहे.
गेल्या दोन दिवसांत तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण तापमान केंद्रावर काल दुपारी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्णतेच्या लाटेमुळे शाळा, रस्त्यावरील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.
विदर्भात अकोला येथे तापमान 44 अंशांवर, तर नागपूरमध्ये 42 अंशांवर गेल्याचे हवामान खात्याचे निरीक्षण आहे. सोलापुरातील तापमानातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.