सोलापूर

सोलापूर आयटी पार्कच्या दिशेने ठोस पावले

  • पुणे : सोलापूर आयटी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुण्यातील हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (MCCIA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा केली. या चर्चेचा प्रमुख उद्देश सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्क स्थापन करण्याचा असून, विविध आयटी कंपन्यांना सोलापूरमध्ये युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा हेतू होता.
  • या बैठकीत सोलापूरच्या युवकांची मोठ्या प्रमाणावर पुणे व इतर शहरांतील आयटी कंपन्यांमध्ये सेवा बजावत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली. सोलापूरमध्ये आयटी युनिट्स स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना मूळ गावी राहून काम करता येईल, तर कंपन्यांसाठीही खर्चात मोठी बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
  • सोलापूरमध्ये आयटी उद्योगासाठी पोषक अनेक सकारात्मक बाबी आहेत – वीज, पाणी, सुसज्ज रस्त्यांचे जाळे, तुलनात्मक कमी खर्चाचा जीवनमान, शांततामय वातावरण, उच्च शिक्षणसंस्था व प्रचंड युवकशक्ती हे सगळे घटक आयटी कंपन्यांना आकर्षित करण्यास समर्थ ठरू शकतात.
  • सोलापूर आयटी असोसिएशनचे प्रयत्न निश्चितच सोलापूरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत. या सकारात्मक संवादामुळे लवकरच सोलापूरमध्ये आयटी पार्क आणि नामांकित कंपन्यांचे आगमन घडून येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
  • या पुढाकारामुळे स्थानिक युवकांना आपल्या गावातच उत्तम नोकरीच्या संधी मिळतील, स्थलांतर थांबेल आणि सोलापूर आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल. आयटी क्षेत्रात सोलापूरचा नवा चेहरा आकार घेण्याची ही नांदी ठरणार आहे. ह्या वेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक निखिल जैन, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे डेप्युटी सी.ओ.ओ. कर्नल शंकर सालकर, सोलापूर आयटी असोसिएशनचे माऊली झांबरे, जयंत होले पाटील, अपूर्व जाधव, स्वप्नील उटगे, गजानन बंडगर, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button