क्राईम

ब्रेकिंग! ट्रकने बाईक, अँब्युलन्स व बसला दिली धडक

  • गुजरातहून बंगळुरूच्या दिशेने जात असलेल्या (जिजे 06-एयू 5073) ट्रकच्या चालकाच्या अति वेगाने आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या साखळी अपघातात सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान जागीच मरण पावला. तर त्याच ट्रकने आणखी एका अँब्युलन्सला धडक दिल्यामुळे अब्युलन्स चालकाचा मृत्यू झाला आहे.
  • हा अपघात आज निडुगुंडी शहरातील बस स्थानकाच्या समोर झाला आहे.
  • मृत जवान मौनेश खुबप्पा राठोड (वय ३५) हे बागलकोट जिल्ह्यातील कालगी तांडा येथील रहिवासी असून ते कालगी तांडाहून निडुगुंडीमार्गे बागलकोट जिल्हातील आलूर तांड्याला पत्नी निर्मला हिस भेटून परत सैन्यात रुजू होण्यासाठी जात होते. निडुगुंडी बस स्थानकाच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे ते जागीच मरण पावले.
  • तसेच, ताळिकोटे वास्को बसलाही ट्रकने धडक दिली, पण बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. नंतर उत्तर प्रदेशातील अँब्युलन्स नंबर यूपी 83 एटी-8108 च्या धडक दिल्यामुळे ज्यात चालक रितेशकुमार (वय ५०) यांचा मृत्यू झाला. ट्रक चालकाच्या अति वेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शकांनी सांगितले.
  • निडुगुंडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहनांना रस्तेबाजूला हलवून वाहतुकीस सुरळीत केले. निडुगुंडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button