क्राईम

गर्भवती तनिषा भिसेच्या मृत्यूचे खापर राहु-केतुवर फोडले

  • गर्भवती महिलेच्या मृत्यूचे खापर डॉ. केळकर यांनी राहु-केतुवर फोडले होते. तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या आहेत.
  • धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मंगेशकर रूग्णालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. तनिषा मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता समोर आला आहे. पन्नास पानांचा अहवाल सादर केला गेला आहे.
  • तनिषा यांचा मृत्यू झाला, त्यादिवशी 7 कोटी 47 लाख रूपये रक्कम मंगेशकर रूग्णालयाकडे शिल्लक होती. जी निर्धण किंवा अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींच्या उपचारासाठी आहे. धर्मादाय आयुक्तालयाची पाचजणांची समिती होती. हा अहवाल दोन दिवस आणि एक रात्र असे सलग बसून बनवण्यात आलाआहे. हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालात डॉ. केळकर जे डीन आणि संचालक आहेत, तेही दोषी आढळून आले. त्यांचे स्टेटमेट देखील धर्मादाय आयुक्तालयाने रेकॉर्ड केले आहे.
  • तनिषा यांच्या पतीचे देखील स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. डॉ. घैसास हे या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहेत. कारण त्यांनी हे डिपॉझिट मागितले होते. ते राहु-केतु वैगेरे. त्यांना काय सुचले, अशी भूमिका डॉ. केळकर यांची होती. ती देखील धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात जशीच्या तशी मांडण्यात आली. परंतु डॉ. केळकरांच्या संमतीशिवाय हे झाले नाही. डॉ. केळकर आणि संपूर्ण मंगेशकर रूग्णालय व्यवस्थापन हेच याला जबाबदार आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button