देश - विदेश
अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले, टॅरिफबाबत मोठी घोषणा

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हे जगातील देशांतील वस्तूंवर आयात शुल्क लावत आहे. त्यामुळे जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. अमेरिकेने भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर (रेसिप्रोकल टॅरिफ) लावला आहे. भारतावर 27 टक्के, तर चीनवर 104 टक्के अतिरिक्त कर लावलाय. मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेकडून चीन वगळता सर्व देशांवरील टॅरिफमध्ये 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चीनवर अतिरिक्त कर लादत 125 टक्के कर लादण्यात आला आहे.
- टॅरिफ धोरणाबाबत बोलताना ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, जागतिक व्यापाराला व्यवस्थित करण्यासाठी घरगुती उत्पादन बनवणे गरजेचे आहे. तसेच चीन हा देश धोकेबाज देश आहे. अमेरिकेचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांच्या विरोधात आहे जे चीनच्या कायदेशीर अधिकारांना हानी पोहोचवते. ही अशी धमकी आहे जी केवळ अमेरिकेच्या हितसंबंधांनाच हानी पोहोचवेल असे नाही.
- तर जागतिक आर्थिक वाढ, उत्पादन स्थिरता आणि पुरवठा साखळींनाही धोका निर्माण करणारे असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या मंत्रालयाने अमेरिकेला हे शुल्क काढून टाकण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतर आता पुन्हा अमेरिकेने जगातील सर्व देशांना दहा टक्के कर कपात करून 90 दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र दुसरीकडे चीनवर 125 टक्के कर लावण्यात आला आहे. अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे की, ज्या देशावरील कर हा 90 दिवसांसाठी दहा टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्या देशांनी अमेरिकेच्या व्यापार विभाग ट्रेझरी आणि यूएसटीआर यांच्याशी व्यापार आणि चलनाची देवाण-घेवाण यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तर चीनकडून जागतिक बाजाराचा जो अनादर केला जातो. त्यामुळे चीनवर हा अतिरिक्त कर लागण्यात आला आहे. जेणेकरून चीनला हे समजायला हवा की, अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचा काळ आता संपला आहे.