क्राईम
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, माझी निर्दोष मुक्तता करा

- बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर सरकारी पक्षाकडून विशेष वकील अॅड. उज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना आपली बाजू मांडली.
- देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात अनेक घडामोडी घडल्याचे निकम यांनी सांगितले. दरम्यान आरोपी वाल्मिक कराड याने कोर्टात अर्ज दाखल केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, मी निर्दोष असल्याने या केसमधून मला डिस्चार्ज देण्यात यावा, असा अर्ज कराडने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे कोर्ट यावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आले आहे.
- दुसरीकडे या प्रकरणातील काही आरोपींनी सीआयडीकडून काही कागदपत्र मागितली आहेत. यामध्ये वाल्मिकचेही नाव आहे. मात्र त्याने मागितलेली कागदपत्र सीलबंध आहेत. त्यामुळे सील उघडल्यानंतर न्यायालयासमोर ती कागदपत्रं दिली जातील, असे निकम यांनी सांगितले. आतापर्यंत आरोपीच्या वकिलांनी जी कागदपत्र मागितली होती, ती सर्व देण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदा वाल्मिकने न्यायालयात आपण निर्दोष असल्याचा अर्ज केला आहे. त्यामुळे यावर पुढील सुनावणी होणार असल्याचे निकम यांनी सांगितले.
- वाल्मिककडून खटल्यातून मुक्त करण्याच्या अर्जावर खुलासा मागितला आहे. त्यामुळे 24 एप्रिलला हा खुलासा सीआयडीतर्फे दाखल करण्यात येईल. त्यानंतर आरोपींवर आरोप निश्चिती करण्याचे काम सुरू होईल. त्यानंतर प्रत्यक्ष पुरावा न्यायालयासमोर सादर केला जाईल, असे निकम यांनी सांगितले.