मनोरंजन
मलायका अरोराच्या अडचणीत वाढ

- अभिनेता सैफ अली खानच्या मारहाण प्रकरण तब्बल तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहे. या प्रकरणात हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. नुकताच, अमृता अरोरा हिने न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवला आहे. संबंधित प्रकरणी मलायका अरोरा देखील न्यायालयात हजर राहणार होती, पण ती आली नाही. यामुळे अभिनेत्री विरोधात वॉरेंट जारी करण्यात आला आहे.
- 22 फेब्रुवारी 2012 रोजी मलायका अरोरा देखील सैफसोबत हॉटेलमध्ये उपस्थित होती. मुख्य न्यायदंडाधिकारी के. एस. झावर सध्या या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदवत आहेत. अमृता अरोरा नंतर मलायकाला साक्ष नोंदवली जाणार होती, पण अभिनेत्री कोर्टात हजर न राहिल्यामुळे वॉरेंट जारी करण्यात आला आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी मलायका विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला. त्यानंतर अभिनेत्रीला सोमवारी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सैफच्या प्रकरणात मलायका अरोराविरुद्ध पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 एप्रिल रोजी होईल.
- हे प्रकरण 2012 मधील आहे. जेव्हा सैफ, करीना कपूर, मलायका अरोरा, करिश्मा कपूर, अमृता अरोरा आणि त्यांचे काही जवळचे मित्र हॉटेलमध्ये डिनर करत होते. तेव्हा हॉटेलमध्ये आलेला उद्योजक इकबाल मीर शर्मा याच्यासोबत सैफची भांडणं झाली. सैफवर उद्योजक आणि त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शर्माने सैफ आणि त्याच्या मित्रांमधील जोरदार वादाचा निषेध केला. तेव्हा सैफने त्याला धमकावले आणि नंतर उद्योजकाच्या नाकावर मुक्का मारला ज्यामुळे त्याच्या नाकातून रक्त येवू लागले.
- पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर सैफ याच्यासबोत आणखी दोन लोकांना अटक करण्यात आली. पण त्यांची जामिनावर सुटका झाली. हा खटला गेल्या 13 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे.