क्राईम

विचित्र अपघात! डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली

  • कार आणि टँकरमध्ये झालेल्या धडकेत पूर्ण कुटुंब संपले आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता कुटुंबासोबत गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येत असताना हा अपघात झाला.
  • रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ वैद्य यांची कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला कार जाऊन धडकली. या अपघातात प्रशांत, त्यांची पत्नी प्रियंका आणि मुलाचा (3 वर्ष) जागीच मृत्यू झाला. तर मुलीचा (5 वर्ष) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात हसते-खेळते कुटुंब संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 

Related Articles

Back to top button