क्राईम

बदलापूर एनकाऊंटर प्रकरणात मोठी घडामोड

  • बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि एनकाऊंटर प्रकरणात पोलिसांचा सहभाग असेल तर गुन्हा नोंदवण्याचे आदेश काल दिले. यासंदर्भात काल सुनावणी पार पडली. यादरम्यानच एनकाऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या अक्षय याचे वडील बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा कुणाशी संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती आता समोर आली आहे.
  • बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी शिंदेचा एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान, या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरच अक्षय शिंदेचे पालक गायब झाले आहेत. त्यांच्या राहत्या घराला कुलूप लागलेले आढळून आले आहे. अक्षयचे पालक काही काळ अंबरनाथमध्ये त्याच्या मावशीकडे राहत होते, मात्र आता तिथूनही ते अचानक निघून गेल्याचे वृत्त आहे.
  • शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांच्या पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, नंतर कोर्टात त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे सांगितले असे बोलले जाते.
  • दरम्यान, शिंदे यांचे पालक वकिलांशीही संपर्कात राहिलेले नाहीत तसेच ते गेल्या दीड महिन्यांपासून ते नेमके कुठे आहेत, ते कसे आहेत याची कोणालाही काहीही माहिती नाही.

Related Articles

Back to top button