क्राईम

क्या बात है! डेरिंगची कमाल… फरफटत नेले, हल्ला केला

  • आपल्या जीवाची परवा न करता पालघरच्या आदर्श नगर परिसरातील काजोल चौहान या तरुणीने या चोरट्यांना भिडण्याचे धाडस केले. काजोलने जोखीम घेत दोन पैकी एका चोरट्याला धरून ठेवले. जर चोराला पकडले नसते तर दोन्ही चोरटे या घरांमधील लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले असते. सध्या दहा ते बारा लाखांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला असला तरी या चोरीत सामील असलेला एक चोरटा काजोलच्या धाडसामुळे ताब्यात आला आहे. या पकडलेल्या एका चोराकडून चोरी केलेल्या लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज ही पुन्हा मिळाला आहे. तर दुसरा चोरटा अंधाराचा फायदा घेऊन दहा ते बारा लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाला आहे.
  • काजोल काल संध्याकाळी आपल्या पती सोबत केळवे येथे फिरायला गेली होती. रात्री आठच्या सुमारास ते दोघे घरी परतले. यावेळी घरातून चोरटे चोरी करून पळून जात असताना काजोल थेट चोरट्यांशी भिडली. यावेळी त्यांनी तिच्यावर हल्ला केला फरफटत नेले. मात्र काजोल घाबरली नाही. यावेळी चोराला एका हाताने पकडले तर दुसऱ्या हातात चोरट्याने केलेला मुद्देमाल पकडून ठेवला. 

Related Articles

Back to top button