क्राईम

ब्रेकिंग! पुण्यात प्लॅस्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे सोनं लंपास

  • पुण्यात चक्क खेळण्यातील बंदूक दाखवत 25 तोळे सोने लुटल्याची घटना घडली आहे.
  • याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भर दिवसा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात हा दरोडा टाकण्यात आला असून बंदुकीचा धाक दाखवत 25 ते 30 तोळे सोने लंपास केले. तीन जणांनी हा दरोडा टाकला. धक्कादायक म्हणजे ही बंदूक खेळण्यातील असल्याचेही समोर आले आहे. 
  • दरोडा टाकलेले हे तीनही आरोपी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले होते. दुकानात आल्यानंतर त्यांनी सोबत आणलेली प्लास्टिकची बंदूक दाखवत दुकानात दरोडा टाकला. यावेळी त्यांनी 25- 30 तोळे सोने लंपास केले अन् पळ काढला. चोरी केल्यानंतर तीनही आरोपी फरार झाले. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button