क्राईम
राज्यात हिंसाचार उफाळला, मध्यरात्री जमावाकडून दगडफेक

- नाशिकच्या काठे गल्लीमध्ये असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच रात्री उशिरा जोरदार राडा झाला. ही दर्गा हटवण्याआधीच नाशिकमध्ये तणाव निर्माण झाला. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये २२ पोलिस जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटोपासून दर्ग्या हटवण्याचे काम सुरू आहे. सध्या काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, काठे गल्ली परिसरात असलेली अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज केली जाणार होती. पण काल रात्रीच याबाबत अफवा पसरली आणि काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली. वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जमाव आणखी आक्रमक झाला. हा दर्गा हटवण्याआधीच अफवा पसरवण्यात आली. काठे गल्लीमध्ये रात्री पाचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी चारशेपेक्षा जास्त लोकांचा जमाव त्याठिकाणी एकाचवेळी आला. जमावाने आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलिस जखमी झाले.
- जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये २ सहाय्यक पोलिस आयुक्त आणि २० हून अधिक पोलिस कर्मचारी जखमी जखमी झाले. दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस सध्या या तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.