इंडिया टीव्ही 9 चे उपसंपादक अजमेर शेख यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्रच्यावतीने राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श युवा पत्रकार म्हणून इंडिया टीव्ही 9 चे उपसंपादक अजमेर शेख यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस) यांनी दिली आहे.
अजमेर शेख यांचा परिचय
अजमेर शेख हे मुळेगाव ग्रामपंचायतचे सदस्य असून इंडिया टीव्ही 9 न्यूजचे उपसंपादक म्हणून काम पहात आहेत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून संपादक रिजवान शेख व इंडिया टीव्ही 9 न्यूजच्या पत्रकार टीमच्या सहकार्यातुन परिसरातील नागरिकांची समस्या आणि अडचणी जाणून घेऊन ते संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून व पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिसांची कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात मुळेगाव ग्रामपंचायत सदस्य असल्याने गोरगरीबांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उपसरपंच शिवराज जाधव यांच्या सहकार्यातुन आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करतात जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून मुळेगाव परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समिती वतीने दिला जाणारा मानाचा 2025 चा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.