क्राईम
ब्रेकिंग! बीडमध्ये भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी हत्या

बीडच्या माजलगाव शहरात तरुणाची आज भर दुपारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा व्हिडीओ समाज माध्यमातून समोर आला आहे. बाबासाहेब आगे असे मयत तरुणाचे नाव आहे. बाबासाहेब भाजचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
हत्येनंतर आरोपी स्वतः हा पोलीस ठाण्यात हजर झाला. नारायण शंकर फपाळ असे आरोपीचे नाव आहे. आगे याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात आगे याचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र ही हत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.