सोलापूर
ब्रेकिंग! सूर्यदेव कोपला, सोलापुरात घामाच्या धारा

राज्याचा ताप वाढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांतील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. दरम्यान आज सोलापूर चांगलेच तापले. काही भागात कमालीचा उकाडा होता. त्यामुळे नागरिकांची तगमग झाली.
सोलापुरात आज उच्चांकी 42.8 अंश सरासरी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम मोडला गेला. शहरात महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची तापमान वाढीची नोंद झाली.