राजकीय
भाजपने मोठा डाव टाकला

- राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. या पराभवानंतर आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. महायुतीत इनकमिंग वाढले आहे. आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य नदी आहेत. म्हणून मी भाजपात आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी भाजपात प्रवेश केला, असे पाटील म्हणाले.
- शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता मात्र संपला. मागील निवडणुकीत आम्ही तटकरेंना खासदार केले. आघाडीमार्फत खासदार झाले. पण आम्हाला ते विसरले. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना भविष्यात काय पद मिळेल पण त्यांनी सांगितले की तुम्ही भाजपात या. तुमच्या ज्ञानाचा आम्हाला फायदाच होईल. आता मी शब्द देतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला.