सोलापूर

सोलापूर! वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार

  • सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्षपदी विजयकुमार बिराजदार तर सचिवपदी अविनाश हत्तरकी यांची निवड करण्यात आली.
  • वीरशैव व्हिजनची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात बसव जयंतीच्या निमित्ताने नूतन उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्याचे पुढील पदाधिकारी खालील प्रमाणे निवडण्यात आले.
  • उपाध्यक्ष : गौरीशंकर अतनुरे.
  • सचिव : अविनाश हत्त‌रकी.
  • सहसचिव : मन्मथ कपाळे.
  • कार्याध्यक्ष : प्रा. शिव कलशेट्टी.
  • सहकार्याध्यक्ष : गणेश घाळे.
  • कोषाध्यक्ष : श्रीमंत मेरू.
  • सहकोषाध्यक्ष : आनंद नसली.
  • व्याख्यानमाला प्रमुख : प्रा. मलकप्पा बणजगोळे
  • उपप्रमुख : राहूल बिराजदार.
  • प्रसिद्धीप्रमुख : अमोल कोटगोंडे, शिवानंद येरटे 
  • सांस्कृतिक प्रमुख : बसवराज जमखंडी, धानेश सावळगी.
  • प्रवक्ता : विनायक दुधगी.
  • नियोजन समिती : सोमनाथ चौधरी, गंगाधर झुरळे, अमित कलशेट्टी, विज‌यकुमार हेले, सिध्देश्वर कोरे, प्रसाद गोटे, राकेश शिलवंत 
  • सोशल मिडीया प्रमुख : चेतन लिगाडे, केतन अंबुलगे.
  • पूजा प्रमुख : मेघराज स्वामी, संगमेश्वर स्वामी 
  • सल्लागार : आनंद दुलंगे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, संजय साखरे, शिवानंद सावळगी, राजेश नीला, मनोज पाटील, बसवराज चाकाई, संतोष अंकद, बद्रीनाथ कोडगी, दीपक बडदाळ, महेश कोटीवाले, राहुल शेटे, योगेश कापसे, संगमेश कंठी, नागेश गदगे, अरुण पाटील.
  •  यावेळी नूतन अध्यक्ष बिराजदार म्हणाले की प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव जयंती निमित्त बसव सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वर्षभर विविध क्षेत्रातील उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी तर सूत्रसंचालन राहुल बिराजदार व आभारप्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले.

Related Articles

Back to top button