क्राईम
पुण्यातील कुख्यात गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी उतरवला माज

- पुण्यातील हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या गुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे. ज्या भागात दहशत पसरवली त्याच भागातून त्याची धिंड काढली आहे. रिझवान उर्फ टिपू पठाण असे धिंड काढलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्याच्या हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात त्याने दहशत पसरवली होती. याप्रकरणी गुंड पठाणसह त्याच्या काही साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात पठाण एका कार्यक्रमात त्याच्या साथीदारासह पैशांची उधळण करत नाचताना दिसत होता. यानंतर पठाण परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टिपू आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी दहशत माजवलेल्या भागातून त्याची धिंड काढली आहे.
- दरम्यान, टिपू पठाणला रस्त्यात उभा करत टिपू आणखी कुणाला त्रास देत असेल तर त्याबाबत पोलिसांना कळवावे. आम्ही आरोपीवर कडक कारवाई करू, तक्रारदाराचे नाव गुप्त राहील, असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.