देश - विदेश

सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का

  • नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या ताब्यासाठी नोटीस बजावली आहे. या प्रकरणात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आरोपी करण्यात आले आहे.
  • नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने तीन ठिकाणी नोटिसा बजावल्या आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आयटीओ येथील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे परिसरातील कॉम्प्लेक्स आणि लखनऊमधील बिशेश्वर नाथ रोड येथील एजेएल बिल्डिंग येथे ईडीने नोटीस बजावल्या आहे. ईडीने या नोटीसमध्ये दिल्ली आणि लखनऊ परिसर रिकामा करण्याची मागणी केली आहे. याबाबत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीकडे मुंबईतील इमारतीचे भाडे ईडीकडे हस्तांरित करण्याचा पर्याय आहे.
  • ईडीकडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम 8 आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये ईडीने जप्त केलेल्या आणि न्यायाधिकरणाने (पीएमएलए) पुष्टी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. या स्थावर मालमत्ता ईडीने नोव्हेंबर 2023 मध्ये जप्त केल्या होत्या.

Related Articles

Back to top button