राजकीय
खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गुजरातमध्ये संघटन सृजन अभियान अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेसचे (AICC) निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा खासदार प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली.
गुजरातमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमण्याचे आणि संघटन मजबूत करण्याचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही निवड कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या आदेशावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केली आहे. याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.