देश - विदेश

26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला फाशी द्या

मुंबईच्या 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला अलीकडे अमेरिकेतून भारतात आणण्यात आले आहे. भारत सरकार याला आपले राजनैतिक यश म्हणत आहे, तर विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. राणाला लवकरात लवकर फाशी द्यावी. त्याचा कोणताही राजकीय फायदा घेऊ नये, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पीडितांचे कुटुंबीयही कठोर शिक्षेची मागणी करत आहेत. यावर आता काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे. तहव्वूर राणा आपल्या देशाचा शत्रू असून अनेक लोकांची त्याने हत्या केली आहे. अश्या माणसाला भारत सरकारने म्हणजेच युपीए सरकार आणि भाजप सरकारने त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न केले. कशा तऱ्हेने राणाला फाशी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

तहव्वूर राणा आपल्या देशाचा शत्रू आहे, ज्याने मुंबईच्या 26/11 चा प्लॅन केला. अनेक लोक ठार केले. त्यांची हत्या केली. या महाराष्ट्राला एक दु:खद प्रकारची आठवण दिली. अशा माणसाला आणण्यात भारत सरकारने कालच्या आणि आजच्या दोन्ही सरकारने प्रयत्न केले. यामध्ये मी मोठा का तु मोठा? हे करत बसण्यापेक्षा त्याला कशा तऱ्हेने फाशी होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button