सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! कुंभारी येथे धावत्या एसटीने घेतला अचानक पेट

- सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील कुंभारी येथे एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. मात्र बस चालकांनी प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास कुंभारी येथील टोळ नाक्यावर घडली. या घटनेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असले तरी अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने प्रवासी चांगलेच भयभीत झाल्याचे बघायला मिळाले.
- मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डवाडी आगाराची बस गाणगापूरहून कुर्डूवाडी कडे जाते. त्यानुसार सोमवारी एम एच 20 बी एल 4215 प्रवाशांना घेऊन कुर्डूवाडी कडे निघाली होती. दरम्यान कुंभारी टोल नाक्यावर बस आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यात जवळपास 30 ते 35 प्रवासी आणि चालक वाहक होते. हे सर्व या अपघातात थोडक्यात बचावले आहेत.
- शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज प्राथमिक अंदाजानुसार एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याने बसच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किटनेही लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, बसचालक प्रशांत पांचाळ त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि स्वतःही इतर प्रवाशांचे सामान घेऊन खाली उतरले. त्यानंतर बसने पेट घेतला. या बसमधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत लांब जाऊन उभारले. तर चालक आणि वाहकाने सदर घटनेची माहिती ११२ या नंबरला दिली असता वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, ॲम्बुलन्स, व अग्निशमन दलाचे गाडी येऊन आग आटोक्यात आणली.