क्राईम
वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी नाही शंभर कोटी…

- बीड येथील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा बनावट एन्काऊंटर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक दावा केला आहे.
- कासले यांनी नुकताच एक दावा करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मिक याचे बनावट एन्काऊंटर करण्यासाठी त्यांना पाच कोटींपासून ते ५० कोटी रुपयांपर्यंतची ऑफर देण्यात आली होती. या दाव्यामुळे पोलीस आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
- शर्मा यांनी कासले यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. कासले हे पोलीस अधिकारी आहेत आणि ते खोटं बोलणार नाहीत. त्यामुळे वाल्मिकच्या एन्काऊंटरच्या सुपारीची बाब खरी असू शकते, असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
- शर्मा यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांचे अनेक काळे कारनामे वाल्मिक याला माहिती आहेत. त्यामुळेच त्याला संपवण्यासाठी प्रयत्न असू शकतो, असा आरोप शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या मते, एन्काऊंटरसाठी देऊ केलेली पाच कोटींची रक्कम ही तुलनेने खूप कमी आहे.
- हे लोक अशी कामे करून घेण्यासाठी शंभर कोटी रुपये सुद्धा देऊ शकतात, असा गंभीर दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.