खेळ
मैदानात रन आऊट; स्टेडियममध्ये फ्री स्टाईल

- आयपीएलमध्ये काल मुंबई आणि दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीवर रोमांचक विजय मिळवला. मुंबई आणि दिल्लीतला हा सामना प्रत्येक बॉलनंतर थरारक होत असतानाच स्टेडियममध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यावेळी एका महिला प्रेक्षकाने पुरुष प्रेक्षकाला मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- या महिलेने पुरुषासोबत हाणामारी नेमकी का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. महिलेने पुरुषाला मारहाण सुरू केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आणि स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या इतर प्रेक्षकांनी हा वाद शांत केला. सुरक्षा रक्षकांनी या महिलेवर तसेच पुरुषावर कारवाई केली का? याबाबतचा सस्पेन्सही अजून कायम आहे.
- मुंबईने दिलेले 206 रनचे आव्हान दिल्ली सहज पार करेल, असे दिल्लीच्या बॅटिंगच्या पहिल्या दहा ओव्हरनंतर वाटत होते, पण मुंबईच्या स्पिनर आणि फिल्डरनी हा सामना फिरवला. कर्ण शर्मा आणि मिचेल सॅन्टनर या दोन्ही स्पिनरनी मोक्याच्या क्षणी दिल्लीला धक्के दिले, यानंतर मुंबईने 19 व्या ओव्हरमध्ये लागोपाठ तीन रन आऊट करून दिल्लीला ऑल आऊट करत सामन्यात विजय मिळवला.