क्राईम

डॉक्टर बनला हैवान, भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले

  • चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या करण्यात आली आहे. डॉ. अर्चना राहुले असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
  • तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. नागपूर शहरातील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.अर्चना या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय 52 वर्ष) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे.
  • घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय.
  • मागच्या काही काळापासून अर्चना यांचे बाहेरील एका व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल यांना होता. याच कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Related Articles

Back to top button