बिजनेस

खुशखबर! सोन्याचे दर घसरले

  • अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे. भारतातील सोन्याच्या किमती सलग चौथ्या सत्रात देखील घसरत आहे. आठवड्याची सुरुवात मंदीच्या पातळीवर झाली, भारतातील सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून घसरले. गेल्या चार व्यापारी सत्रांमध्येच सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे 3,650 रुपयांची घसरण झाली आहे, म्हणजेच चार टक्केची तीव्र घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम नव्वद हजार रुपयांच्या खाली आला आहे.
  • भारतातील सोन्याचा दर आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 650 रुपयांनी घसरून 89,730 रुपये झाला. तर भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर झपाट्याने घसरला. प्रति दहा ग्रॅम 600 रुपयांनी घसरून 82,250 रुपये झाला. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 490 रुपयांनी घसरून 67,300 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

Related Articles

Back to top button