क्राईम
ब्रेकिंग! करुणा शर्मांचा तसला व्हिडीओ व्हायरल?

- धनंजय मुंडे यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या करुणा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या काही खासगी क्षणांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. माझे तसले व्हिडीओ व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप करत त्यांनी या कारवाईमागे काही राजकीय शक्ती असल्याचे सूचित केले आहे.
- व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फेसबुकवर लाईव्ह येत करुणा शर्मा म्हणाल्या, माझ्या खासगी जीवनात घुसखोरी करून मला बाई म्हणून खाली दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मी आता थांबणार नाही. त्या पुढे म्हणाल्या की, या व्हिडीओमुळे मी तुटणार नाही, उलट यातूनच मी अधिक बळकट होईन. त्या म्हणाल्या की, माझ्या विरोधात जी खेळी खेळली जाते आहे ती मी ओळखतेयl. पण मी आता सर्व पुरावे उघड करणार असून, कोणकोणत्या व्यक्तींनी हे व्हिडीओ व्हायरल केले, याचाही तपास व्हायला हवा.



