सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! अवकाळीने डाव साधला

- आज रात्री नऊच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे राहणारी राजनंदिनी अणय कांबळे असे मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
- सोलापूर शहरामध्ये सायंकाळी साडेसहा नंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती.
- नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा सुद्धा हलू लागल्या होत्या. याचमुळे कोनापुरे चाळीत मरण पावलेल्या राजनंदिनी या विद्यार्थिनीच्या घराच्या वरून जाणारी विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला. त्याच वेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली. हे समजल्यावर नातेवाईकांनी तातडीने त्या विद्यार्थिनीला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हरवले मात्र डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केल्याचे सांगण्यात आले