बिजनेस

ट्रम्प तात्याचा मोठा डाव, तरीही भारतीय शेअर बाजार सावरला

  • अमेरिकेच्या टॅरिफ करामुळे जगभरातील शेअर बाजारात गोंधळ आहे. याचा परिणाम काल भारतावरही झाला. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचा परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी काल भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला होता.
  • काल एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर आज मात्र शेअर बाजार सावरला आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी दिसून आली. बाजाराच्या सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची तेजी दिसून आली. सध्या सेन्सेक्स 74,324 अंकांवर व्यवहार करत आहे. यांसह एनएसई निफ्टी जवळपास 400 अंकांच्या वाढीसह 22,540 वर ट्रेंड करत आहे.
  • मेटलच्या स्टॉकमध्ये सध्या खरेदीचे चित्र आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सेन्सेक्स रिकव्हरीच्या मूडमध्ये आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीत Tecilchem, Keyfinserv, Shrenik, SMLT, One point टॉप गेनर्स ठरले आहेत तर Growwn 200, Abin-Ret, Msciindia, Kpc global, Mafang टॉप लूजर्स ठरले आहेत. निफ्टीत 371 अंकांच्या वाढीसह 22635 वर ट्रेंड करत आहे. अमेरिकी शेअर बाजारातून संमिश्र संकेत आहेत तर आशियाई शेअर बाजारात मात्र तेजी आहे. विदेशी बाजारांतूनही चांगले संकेत मिळत आहेत. आशियाई बाजारांत तेजीचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर दिसू शकतो.

Related Articles

Back to top button