महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट

  • विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, पण विरोधकांच्या निशाण्यावरही ही योजना खूप आली. मात्र आता याच योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार, असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भातही माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय्य तृतीया असून त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार असल्याचे समजते.
  • या योजनेचे पैसे हे बँक खात्यावर टाकण्यासाठी सरकारला आत्ता प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार या योजनेचा हफ्ता प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला होणार, असे सांगितले गेले होते. मात्र एप्रिलचा हफ्ता 30 तारखेला मिळणार आहे.

Related Articles

Back to top button