क्राईम
ब्रेकिंग! पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू नव्हे तर हत्याच

- सध्या राज्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि गर्भवती महिलेचे मृत्यू प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणी मृत्यूची चौकशी व्हावी, अशी मागणी विविध संघटनांसह भिसे कुटुंबियांकडून केली जात आहे.
- या मृत्यूला दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुुळे यांनी गर्भवती महिला (तनिषा भिसे) यांचा मृत्यू झाला नसून हत्या झाली आहे, त्यामुळे या प्रकरणातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
- मृत महिला (तनिषा भिसे) ज्या मुलींना जन्म दिला आहे, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक असून मुलींवर आयसीयुमध्ये उपचार सुरु आहेत. भिसे कुटुंबिय वेगळ्या दु:खातून जात आहे. सरकारने संवेदनशीलता दाखवावी, भिसे यांची जशी हत्या झाली, तसा दिवस राज्यातील कोणत्याही लेकीवर येऊ नये, त्यासाठीच मी इथे आली असल्याचे सुळे म्हणाल्या.