क्राईम

आम्ही डिपॉझिट घेत नाही, पण त्यादिवशी राहू-केतू …

  • पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी एक महत्त्वपूर्ण कबुली दिली आहे. त्यादिवशी गर्भवती महिलेकडे दहा लाख रुपये डिपॉझिट मागितले होते, हे त्यांनी मान्य केले आहे. पण त्यामागे एक विचित्र स्पष्टीकरणही दिले आहे.
  • डॉ. केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यादिवशी गर्भवती महिलेकडे दहा लाखांची डिपॉझिट मागितले होते. त्यांच्या या कबुलीमुळे रुग्णालयाने पैशांची मागणी केल्याच्या कुटुंबीयांच्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.
  • मात्र, ही मागणी का केली गेली याचे स्पष्टीकरण देताना डॉ. केळकर यांनी एक विचित्र विधान केले. ते म्हणाले, आम्ही (रुग्णालय) डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झाले माहिती नाही, पण दहा लाखांची डिपॉझिट मागितली गेली.
  • त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयाचे धोरण डिपॉझिट घेण्याचे नसतानाही त्या विशिष्ट दिवशी असे का घडले, याबद्दल ते अनभिज्ञ असल्याचे किंवा त्याचे खापर दैवावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे या विधानातून दिसून येते. त्यांच्या या ‘राहू-केतू’च्या उल्लेखाने मात्र अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Articles

Back to top button