सोलापूर
ब्रेकिंग! पाणी नको विष द्या, पाणी नको विष द्या

- सोलापूर शहरातील कुचन नगर परिसरात आज पाणीपुरवठा झाला. परंतु त्या पाणीपुरवठ्यात मिश्रीत, आळ्यायुक्त, गटारीचे पाणीपुरवठा करण्यात आली आहे. त्यामुळे त्या पाण्याच्या बाटली घेऊन सर्व नागरिक बंधू भगिनींनी विषणू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांनाा निवेदन दिले. आम्हाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्या नाहीतर विष द्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- आज झोन नं ८ मध्ये समाविष्ठ असलेले कुचन नगर परिसरात पाणी पुरवठा होत असुन नळाला पाणी गटारीचे काळे पाणी, अळया युक्त पाणी, दुर्गधीयुक्त् वास येणारे पाणी अश्याप्रकारचा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत कारमपुरी यांनी उपायुक्त रवी पवार यांना संपर्क साधला असता पाणीपुरवठा माझ्या अखत्यारित येत नाही. तुम्ही कारंजे साहेबांना संपर्क साधा असे सांगितले. त्यानंतर कारंजे साहेबांना संपर्क साधले असता, विभागीय अधिकारी झोन क्र. ८ व त्या विभागाच्या पाणीपुरवठा अधिकारीकडे संपर्क साधा., असे उत्तर दिले आणि काही वेळेनंतर याठिकाणी पाणी पुरवठा अधिकारी वर्ग आले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केले असता नळाद्वारे आलेले पाणी भयंकर असे दुर्गंधी व आळया असल्याचे पाहून त्यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन, त्यांना माहिती देऊ असे म्हणून निघुन गेले. म्हणजेच त्यांना ही दुर्गंधी युक्त पाणी पुरवठयाचे कारण समजले नाही. यावरून दुर्गंधी युक्त पाणीपुरवठा बंद होण्यासाठी व पाणी पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर आपल्या अध्यक्षतेखाली बैठक होणे गरजेचे आहे. तरच आपण याबाबत योग्य कार्यवाही करु शकतो., असे आम्हांस वाटते आणि त्वरीत कुचननगर परिसरातील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करा अशी मागणी करीत आहोत. तरी माननीयांनी वरील विषयाबाबत गंभीर दखल घेवून स्वच्छ पाणीपुरवठा करुन सहकार्य करावे., ही विनंती, असे नमूद करण्यात आले.