हवामान
बिग ब्रेकिंग! सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला

- मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख वर चढत आहे. सूर्य तापल्यामुळे सोलापूरसह अनेक शहरांमध्ये चाळीस अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
- हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक आणि परिसरात चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे मराठवाडा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दरम्यान आज सोलापुरात यंदाच्या वर्षातील 42 अंश इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.