बिजनेस
ब्रेकिंग! बॅक टू बॅक दणके

- पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पाद शुल्कात दोन रूपयांची वाढ केल्यानंतर आता मोदी सरकारने घरगुती सिलेंडरच्या किमतीत तब्बल 50 रूपयांची वाढ करत मोठा झटका दिला आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली. वाढीव दर आज रात्री बारा वाजल्यापासून लागू होतील.
- सरकारने एक वर्षानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता. गॅस सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. विशेष म्हणजे जुलै २०२२ नंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. तरीही गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
- घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ केली जात असून ही दरवाढ आज मध्यरात्री 12 वाजेपासून लागू होईल. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल. तसेच कोलकातामध्ये किंमत ८२९ रुपयांवरून ८७९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपयांवरून ८५३.५० रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ८१८.५० रुपयांवरून ८६८.५० रुपये होईल.