बिजनेस
ब्रेकिंग! उद्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलच्या उ्त्पादन शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आज सकाळी शेअर बाजारात तीन हजार अंकांपेक्षा जास्त घसरण पाहण्यास मिळाली. यामुळे करोडो गुंतवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हा झटका सहन होत नाही तोच आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रूपयांची वाढ केली आहे. याबाबत महसूल विभागाकडून अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत.