क्राईम
तनिषा भिसेंना पाच तास रक्तस्राव, तरी उपचाराविना ठेवले

- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपडेट आहे. राज्य सरकारच्या समितीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तांसमोर प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बैठक पार पडली. हो…दीनानाथ मंगेशकर रूग्णालय गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार आहे, असे रूपाली यांनी सांगितले.
- राज्य महिला आयोगासमोर याप्रकरणी आज राज्य सरकारच्या समितीने अहवाल सादर केलेला आहे. यावर बोलताना चाकणकर यांनी म्हटले की, आज पुणे पोलीस आयुक्तालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीपूर्वी मी भिसे कुटुंबियांची घरी जावून भेट घेतली. कोणतीही व्यक्ती रूग्णालयात गेल्यानंतर ते वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्यांना सांगतात, जेणेकरून उपचार चांगला मिळावा. पेशंट 15 मार्चपूर्वी डॉ. घैसास यांना भेटलेले होते. त्यांना रूग्णाची मेडिकल हिस्टरी माहित होती. ही माहिती वैयक्तिक ठेवायची असते, परंतु घटना घडल्यानंतर. रूग्णालयाच्या समितीने आपल्या बचावासाठी ही माहिती सर्वांसमोर मांडली, याचा चाकणकर यांनी निषेध केला. रूग्णालयाने मगरूरी केली, हलगर्जीपणा केला. यामुळे रूग्णालय दोषी आहे. साडेपाच तासांचा अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने रूग्णाचा मृत्यू झाला, असे रूपाली यांनी सांगितले.
- एक तारखेला रूग्णालयात पेशंट गेल्यानंतर नऊ वाजून एक मिनिटांची पेशंटची एन्ट्री आहे. त्यानंतर त्यांनी पेशंटच्या ऑपरेशनची तयारी केली. स्टाफला सूचना दिल्या, परंतु रूग्णाला ऑपरेशनसाठी घेवून जाण्याअगोदर दहा लाखाची मागणी केली. ही गोष्ट पेशंटसमोरच घडत होती.
- संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले. पण याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. तब्बल पाच तासांनी पेशंट बाहेर पडले. पण मंगेशकर रूग्णालयाने पेशंटवर उपचार केले नाहीत. यादरम्यान अतिरिक्त रक्तस्त्राव झाला. दुसऱ्या रूग्णालयात गेल्यानंतर पेशंटची डिलिव्हरी झाली. परंतु खचून गेल्यामुळे रूग्णाचा मृत्यू झाला. सूर्या रूग्णालयाकडून पेशंटवर चांगले उपचार झाले, हे सर्व कुटुंबाच्या घरातील सदस्यांनी अर्जात मांडले आहे.