हवामान
ब्रेकिंग! राज्यातील ‘या’ भागात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना, आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे. पाच ते आठ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि लातूर या नऊ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. परिणामी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.