ब्रेकिंग! नवे संकट राज्याच्या वेशीत…

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. राज्यात ठिकठिकाणी गारपीट, अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील विविध भागांला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.
सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळासारख्या वाऱ्याची निर्मिती झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांसाठी कोकणात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी केला आहे. सध्या कोकणात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. एका तासाच्या पावसामुळे तयार झालेले आंबे गळून पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात तयार होणाऱ्या लहान कैऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासून वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू आहे. नाशिक शहरालाही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला.