देश - विदेश

ठाकरे गटाचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंकडून अमित शहांचे कौतुक

  • मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले. दरम्यान, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झाले आहे. मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला ठाकरे गटानेही पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिले.
  • मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मांडताना शहा यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शहांनी मांडलेल्या या प्रस्तावावर ठाकरे गटाने पाठिंबा दिला. शहा हे खंबीर गृहमंत्री आहेत, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहा यांचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button