सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्याला भूकंपाचे झटके

सोलापूर जिल्ह्याला आज भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रिश्टरस्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी सोलापूरमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर २.६ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदु हा जमिनीपासून पाच किलोमीटर खाली होता. दरम्यान या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही.