सोलापूर
ब्रेकिंग! पुणे-सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात

- पुणे सोलापूर महामार्गावर आज तिहेरी वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून आयशर टेम्पो पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने चालला होता. आयशर टेम्पो चौफुला येथील जगदंबा हॉटेल समोर आला असता चालकाचे त्याच्या ताब्यातील आयशरवरील नियंत्रण सुटले.
- त्यानंतर आयशर डीव्हाडर तोडून थेट सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या एका ट्रकचा व आयशरचा भीषण अपघात झाला. तसेच या ट्रकला पाठीमागून आलेल्या एका ट्रकने मागून धडक दिली. त्यामुळे असा तिहेरी अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात मृत्यू व जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.